About

 

खरं तर ‘About me’ हा प्रकारच मला मुळात आवडत नाही. ज्याप्रमाणे एखादं पुस्तक लिहिण्यापेक्षा त्याची प्रस्तावना लिहीण अवघड असतं किंवा एखादा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याला नाव देणं जास्त अवघड असतं तसंच माझ्या बाबतीत ‘About me’ हा प्रकार! (‘बाळ जन्माला घालणं सोपं पण त्याला साजेल असं नाव ठेवणं खूप अवघड’ हे हि एक उदाहरण सुचलं होतं पण परत विचार केला एवढही वाहत जाण योग्य नाही!)  बरं आयुष्यात काही चांगली कामं केली असती तर खुशाल स्वतःच्या कौतुकाचे पूल बांधून, टिमक्या वाजवून मोकळा झालो असतो पण तसही काही केलेलं आठवत नाही. जिल्हा परिषद शाळेत शिकलो, बारावीत दोनदा नापास झालो, मोजता येणार नाही एवढ्या नोकर्या बदलल्या. असे सगळे दिवे लावल्यानंतर ‘About me’ मध्ये लिहायचं काय @#!! राहिला विषय लिखाणाचा तर त्या बाबतीत मी अतिशय मूर्ख माणूस आहे. (‘माणूस’ म्हणतोय कारण आता मी जवळपास पंचवीस वर्षांचा झालोय. ‘ऑन द वे ट्वेन्टी फोर’ स्वतःला ‘मुलगा’ म्हणून घेण्याचा माझा मलाही अधिकार राहिलेला नाही, त्यातल्या त्यात ‘स्टील सिंगल’ ते दुःख वेगळंच, त्यावर चर्चा न केलेलीच बरी!) ह्या ब्लॉगचं नाव पाहून एव्हाना तुम्हाला प्रचलित झालंच असेल! तरीही सांगतो, मला लिखाणातला ‘ल’ सुद्धा कळत नाही, त्यातल्या त्यात इंग्रजी पेक्षाही अवघड हे मराठी व्याकरण (किमान माझ्यासाठी तरी अवघडच!) ह्रस्व-दीर्घ वेलांट्याचे नियम मला उमजत नाहीत, ही तर खूप मोठी गोष्ट झाली, साधं ‘न’ आणि ‘ण’ ह्या दोन्ही सख्या भावांचे नेमके काय भांडण आहेत हेही मला माहित नाही म्हणून लिखाण वगैरे काही नाही ह्याला आपण सरळ सोप्या भाषेत “खरडनं’ म्हणू! (मला गिटार वाजवता येत नाही म्हणून मी त्याला ‘वाजवणं’ म्हण्या ऐवजी ‘खाजवणं’ म्हणणं जास्त प्रिफर करतो!) आता तुम्ही म्हणाल “एवढं सगळं आहे तर मग का बाबा खटाटोप करतोस, जमत नाही तर लिहितोयस कशाला?” आणि तुम्हाला असं वाटण अगदी साहजिक आहे. पण ते म्हणतात न “अंगातले किडे !” तसंच माझं आणि लिखाणाचं आहे निव्वळ अंगातले किडे बाकी काही नाही! म्हणून…D4mad…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *