आयच्या गावातचला हसू येऊ द्या

सेक्शन रिसेप्शन …

NEW – AUDIO BLOG – NEW

दरवाजा उघडताच ओडोनिलचा दर्प नाकात जातो आणि एसीच्या कूल वातावरणात समोर रिसेप्शन काउंटर वर एक हॉट रिसेप्शनिस्ट दिसते… मोकळे केस, बोल्ड लिपस्टिक, मोठे राउंड ईयर रिंग्स, फुल टच अप विथ ब्लॅक आय लाइनर; त्या हॉट लुक मध्ये भर घालणारा शॉर्ट वन पीस आणि हाय हिल्स… (आता तुम्ही म्हणाल काउंटर मागच्या या सगळ्या गोष्टी मला कशा दिसताय..? हाहाहा… काही नाही खुप सोप्प असतं…! फक्त समोरच्या व्यक्तिची नजर चुकवून आपले तळपाय समोरच्या बाजूने थोडे ऊंच करून काउंटर च्या आत डोकावून पहायचं (स्वतःच्या रिस्कवर)… तिला पाहून मूड अगदी फ्रेश होऊन जातो.! बाय द वे, बऱ्याचदा छोट्या ऑफिस मध्ये याच हॉट लुक मागे एक गावठी आवाज असतो पण स्टील, ‘इतने पैसो में इतनाच मिलेगा रे बाबा..!’ म्हणून असं निदर्शनात आल्यास मुळीच आश्चर्य वाटायला नको.. पण इतर मोठ्या ऑफिसेस मध्ये फ्लूएंट इंग्लिश विथ हॉट लूक म्हणजे फूल टू कॉम्बो….

मुळात रिसेप्शनिस्ट हा प्रकारच खुप भन्नाट आहे; पण तो फक्त कॉर्पोरेट ऑफिस मध्ये. त्या व्यतिरिक्त तुम्ही सरकारी ऑफिस, बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणचे रिसेप्शनिस्ट (पूछताछ काउंटर/ चौकशी विभाग) तर पाहिलेच असतील…! खाकी कपडे घालून स्वतःच्याच कामामुळे आयुष्याला कंटाळलेली सीनियर मंडळी मोठा चश्मा लावून समोर बसलेली असतात. यांना तुम्ही कितीही प्रेमाने काहीही विचारा ते मात्र तुम्हाला अगदी रागात आणि इग्नोर करूनच उत्तर देतील आणि चिडचीड करून हाकलून लावतील. मुळात त्याचा चेहरा पाहूनच त्यांना काही विचारायचीही भीती वाटते. त्यातल्या त्यात जर तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीचा त्यांनी अपमान केला तर तुम्ही मागच्या मागे कल्टी मारणं अगदी साहजिक आहे.

कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असं नसतं. कॉर्पोरेट मध्ये 99.99% सुंदर लेडी रिसेप्शनिस्टच असतात ज्यांना अगदी जेमतेम पगार मिळत असतो तरी त्या अगदी निस्वार्थ पणे आपलं काम करत असतात (मला तर कधी कधी वाटत दिवसभर मेकप करायला मिळतो म्हणून मुली हा जॉब करत असाव्यात कारण त्यांचं ते आवडतं काम असतं; नाहीतर एवढ्या कमी पगारात एवढं स्ट्रगल उगाच कोणी का करेल..?) सखोल अभ्यास केल्या नंतर माझ्या असं निदर्शनास आलं की या बिचाऱ्या कॉर्पोरेट रिसेप्शनिस्टही अगदी मध्यमवर्गीय असतात. त्यांनाही घरी इच्छा नसताना पाणी भरणे, दळन दळून आणणे, झाडू मारणे, धुनी भांडी करणे, अशी अनेक नावडती कामं करावी लागतात. जरी नगर पालिकेच्या शाळेत शिकलेल्या असल्या तरी त्यांचा ऑफिसचा हॉट स्मार्ट शॉर्ट लुक पाहून त्या नक्कीच Oxford University’च्या स्टूडंट असतील अशी मनाला भुरळ पडते. घरी कमरेला ओढनी बांधून झाडू मारणारी मुलगी ऑफिसच्या कॉम्प्युटर वरून बॉयफ्रेंड सोबत चॅटिंग करताना पाहून क्षणभर हेवा वाटतो… पण हे सरकारी रिसेप्शनिस्ट मंडळी दांडगा पगार असून सुद्धा नवरा/बायको (वय पाहता त्यांना कदाचित bf/gf तर नसतीलच म्हणून), खडूस बॉसची चीडचीड, लंच टाइम मध्ये जेवायला झालेला उशीर, आज ऑफिस मध्ये चहा मिळाला नाही, घरी नळ आले नाही, पोरगं नापास झालं, आज सासू घरी येणार, बोनस कमी आलं यासारख्या कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींचा राग तुमच्यावर काढू शकतात; तेही अगदी रुबाबात….

जेव्हा मी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काही कामा निम्मित्त जातो तेव्हा बऱ्याचदा रिसेप्शनिस्टला विचारायला काहीच नसलं तरी मुद्दाम काहीतरी कारण काढून रिसेप्शन काउंटरवर जाण्याची इच्छा होतेच. कारण या रिसेप्शनिस्ट कधीच चिडचिड करत नाहीत. त्यांना काहीही विचारा अगदी अगदी हसूनच उत्तर देतात. वरतून स्वतःच ‘Thank you’ सुद्धा म्हणतात. (ट्रेनिंग बेटा, सब ट्रेनिंग होता है) तुम्हाला काय वाटतं त्यांना प्रॉब्लेम्स नसतात?त्यांचा बॉस कितीही खडूस असो, बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालेला असो, तीन महिन्यांपासून पगार झालेला नसो, घरी आई बाबा कितीही त्रास देत असो (जसे bf शी चॅटिंग न करू देणे वगैरे); यासारखे कितीही भयानक प्रॉब्लेम्स असले तरी या रिसेप्शनिस्ट कधीच आपल्याला तुसड्या सारखी वागणूक देत नाहीत. सर्व दुःख आपल्या बोल्ड मेकअप मागे लपवून ठेवत असतात आणि आपल्याला गोड हसून निस्वार्थपणे मदत करत असतात. या बाबतीत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच! (मोठ्या हौसेने घेतलेला घरातील एकमेव वनपीस वाया जाऊ नये म्हणून कदाचित यांची ही सगळी धडपड असावी) Anyways…. Actually बॅचलर असल्यामुळे शक्यतो माझं सरकारी ऑफिस मध्ये फारसं काम नसतं. दुसऱ्या कुणाचं असेल तरी होईल तिथपर्यंत टाळतो कारण भोळ्या, काळ्या चेहऱ्याला पाहून कदाचित ते जास्त अपमान करतात. असो! ती कामे ऑनलाईन केलेलीच बरी…

 

-D4mad

3 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *