आयच्या गावातचला हसू येऊ द्या

मूर्खांचा बाजार डॉट कॉम …

“Hello मी मूर्ख माणूस बोलतोय.”…

“Ok बोला.”

“मी’बैलकामगार.कॉम” वर तुमची ऍड पाहिली. तुमच्याकडे रिकाम्या दुरूपयोगी लोकांसाठी कामं आहेत असं कळलं होतं.”

“Ohh. अच्छा…! पण आता जागा शिल्लक नाहीत, पुढच्या वेळेस गरज असल्यास तुम्हाला नक्की कळवण्यात येईल.” (नाकावर टिचुन क्रूरपने समोरून ‘धडमsss’ असा जोरात रिसीवर खाली ठेवला जातो.)

मग तो मूर्ख माणूस newspaper, सर्व जॉब रिलेटेड वेबसाइट्स वर कॉन्टॅक्ट शोधून कॉल, msg करून जॉब साठी प्रत्येकाला विनंती करतो. ओळखीच्या लोकांना तर सोडा पण जो भेटेल त्या अनोळखी व्यक्तिलाही जॉब बद्दलच विचारतो. मित्र, प्रेम, विनोद, आवडत्या सिरीयल, जेवन, ब्रेकपचं दुःख, घराशेजारची लाईन मारणारी पोरगी, फेसबुक, व्हाट्सएप्प, टिंडर… रादर… क्रश, मुलींचे msg या सगळ्या गोष्टींचा त्याग करून सकाळी कमोड सीटवर बसल्या पासून रात्री डोळे बंद करे पर्यंत कुठली हौस-मौज नाही किंवा कुठल्या अपेक्षा नाही; फक्त कुठेतरी काहीतरी नोकरी मिळावी हाच एक विचार. इव्हन त्याला झोपेत स्वप्नही नोकरीचेच पडतात. ‘सारी दुनिया एक तरफ आणि नोकरी मिळवण्याचा स्ट्रगल एक तरफ!’ तरी कायम अपयश पदरी पडतं…. हा काळ म्हणजे ‘खुप उशीर झाल्या मुळे लग्न न जमणाऱ्या मुली सारखा असतो; इच्छा नसतांना सतत कांदेपोहे सारखे interview… तो irritate करणारा प्रश्नोत्तरांचा सोहळा आणि नेहमी ठरल्या प्रमाणे ‘नकार’! असो.

एक महिन्या नंतर…..
हे न पहावणारं दुःख पाहून एक लांबचा मित्र त्याला एका हॉटेल मध्ये ‘फुकट भाव’ वेटरचं काम ऑफर करतो. नावाला हॉटेल पण actually असतो तो ‘ढाबा’. (काम कसलंही असो शब्दांचा स्टँडर्ड जपायला हवा म्हणून ‘जॉब’) वेळ आणि परिस्थिती पाहता देवघरा शेजारी रामायण, महाभारत व इतर धार्मिक ग्रंथ बांधून ठेवलेल्या रंगीत कापडात तो त्याचे सर्व मार्कशीट आणि जुने experience letters गुंडाळून देवालाच अर्पण करतो. आणि वेटर म्हणून काम करण्यासाठी ‘होकार’ देतो. का देऊ नये? कारण माँ कहती है, “कोई काम छोटा या बडा नही होता आणि काम से बड़ा कोई मजहब नही होता.” या सगळ्या म्हणायच्या गप्पा आणि डायलॉग पण खरंतर आयुष्याची ‘वाट’ (L) लागलेली पाहता जे मिळेल ते करून किमान राहण्या खाण्याचा खर्च भागवणे महत्वाचं.! नाही का..?

सो दुसऱ्या दिवशी डोक्याला रुमाल आणि 1/3’rd बरमूडा घालून नवीन ऑफिस उर्फ हॉटेल कम ढाबा जॉइन करायला निघणार तोच notification ची बेल वाजते ज्यात एक मेल येतो आणि कळतं की एक महिन्याभरा पूर्वी सेल्स एक्सिकेटिव्ह साठी दिलेल्या
मुलाखतीत आपली निवड झालेली आहे..! सोबत ऑफर लेटर ही आलय… वाह..! पगार खुप नसला तरी ‘वेटर पेक्षा बेटर’ ऑप्शन वाटला म्हणून हॉटेल मालकास कॉल करून छाती तानून नकार दिला… आठ दिवसा नंतरची जॉइनिंग डेट असल्याने चार दिवस अगदी निश्चिन्त घालवले; पण पाचव्या दिवशी एक कॉल आला..

“हेलो मिस्टर मूर्ख माणूस बोलताय का..(!)? ”

“हो सर मीच बोलतोय मूर्ख माणूस.”

“तुम्ही आमच्या वर्तमान पत्रातील जाहिरात पाहून आम्हाला कॉल केला होतात..!”

“हो सर आणि सर्व documents मेल देखील केले होते व तुम्ही मला काही दिवसात कळवतो म्हणाले होते..”

“Yes मिस्टर मूर्ख मी तुमचे सर्व पेपर्स पाहिले. आय थिंक तुम्ही आमच्या डिजटल ऍड एजेंसी साठी अगदी छा(घा)न लिहू शकता. तसं तुम्हाला वरिष्ठांकडून ट्रेनिंगही दिलं जाईल, सो आता मी तुमचा कॉलवरच एक छोटासा interview घेईल व त्यानुसार तुमची पात्रता पाहुन तुमचं सीलेक्क्षन आणि पॅकेज ठरवण्यात येईल.”

“Ok सर… चालेल.”

तब्बल एक तास नको-नको ते थूकरट प्रश्न विचारून एकदाचा interview संपला.. हवं तेवढं नाही पण खर्च भागेल एवढं पॅकेज तर ठरलं… पण असो, हरकत नाही. रायटिंग वर्क हे आवडीचं काम असल्याने आणि भविष्यात अशाच फील्ड मध्ये काम करायची इच्छा असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता दृढ निश्चय करून इथेच जॉइन करायचं ठरवलं. रितसर अगोदच्या सेल्स एक्सीकेटिव्हच्या जॉब साठी स्वतः कॉल करून रुबाबात नकार दिला…

तो कॉल ठेऊन मोठा समाधानाचा मोकळा श्वास टाकणारच की फोन केकाळला.! पिन कोड पाहता कॉल मुंबईहून आलाय असं लक्षात आलं. कॉल रिसीव केल्या नंतर एका सूंदर मुलीचा आवाज आला..

“हेलो धिस इज श्रेया फ्रॉम बेस्ट “चिप” मोबाईल कंपनी, can I talk to Mr. मूर्ख माणूस?”

“Yes.. I am.”

“Mr. मूर्ख, ‘मी’बैलकामगार.कॉम’ पर आपका प्रोफ़ाइल देखा, आपको सेल्स में काफी अच्छा एक्सपीरियंस है..!”

“जी हां मॅडम..” (सम वयाची मुलगी वाटत असली तरी संतुर’मॉम असू शकते..! म्हणून अरे-तुरे करण्या ऐवजी अहो-काहो केलेलं बरं! आपल्याकडे भरपूर जॉब्स पडलेले असले तरी पप्पा कहते थे, [मूर्ख माणसाचे] “माणसाने माज करू नये..” म्हणून सभ्यतेने घ्यावं.)

“सो Mr. मूर्ख नाशिक के लिए हमारे यहां एक ASM (area sales manager) की पोस्ट खाली है… अगर आप interested है तो आजही आपके interviews हो जायेंगे।”

“Ok मॅडम… चलेगा।” (चांगली पोस्ट म्हणजे भरपूर पगार..! या विचारने ऍड एजन्सीचं रायटिंग वर्क म्हणजेच dream work एज्युकेशन झाल्यावर करूयात या विचाराने इच्छा नसतांनाही आर्थिक परिस्थितीला हतबल होऊन मूर्ख माणूस हा निर्णय घेतो.)

“सो आपका एक interview हमारे मैनेजर Mr. गधाराम लेंगे। अगर आप ये interview क्रॅक करते है तो कल वीडियो कॉल पे आपकी फाइनल interview हमारे HR सर Mr दलिंद्रे लेंगे।”

“Ok जी।”

परत दोन तास interview कम बलात्कारा नंतर मैनेजर ने HR च्या फाइनल बलात्कारा साठी मुर्ख माणसाला सिलेक्ट केलं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे 10:30 ला एका म्हाताऱ्या माणसाने Skype वर interview घेतला आणि selection झालं..! हुशशशश्… मेलवर ऑफर लेटर आलं..! चांगली पोस्ट..! ठीक ठाक पगार..! उद्याच जॉइनिंग..! आता राहिलं पेपर वर्क. तसे रिज्यूम आणि ऑफर लेटर मेल केले पण इतर गोष्टी अजून बाकी होत्या…

दुसऱ्या दिवशी प्रेस केलेल्या कपड्यांवर डीओ मारून शर्टिंग करून एकदम ऑफिशीअल लुक मध्ये ऑफिस मध्ये इंट्री मारली. धूळ खात पडलेला ASM चा डेस्क पाहून अभिमान वाटत होता. रुबाबात चेयर वर वर्म टेकवून सर्वप्रथम ऍड एजन्सीच्या जॉबला नकार कळवला… कामाचं शेड्यूल ठरवलं, आणि सेल्स टीम ची ओळख करून घेतली… पहिला दिवस मस्त पार पडला.. घरी जाता जाता डेस्कटॉप वर एक मेल मिळाला ज्यात कंपनीने काही documents मागितले होते. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रोपर नाशिकचा नसल्यास एक लोकल साक्षीदार, डिग्री, आणि गाडीचे डिटेल्स….

मूर्ख माणसाने दुसऱ्या दिवशी HR ऑफिसला मेल करून आधार, पॅन आणि घरमालकाचे कागदपत्र साक्षीदार म्हणून दिले… त्याच बरोबर गाडी नाही व graduation complete नाही म्हणून डिग्री नाही असही कळवलं… समोरून उत्तर मिळालं की ‘गाडी किंवा डिग्री नसली तरी चालेल पण साक्षीदार राजकारणी नसावा, तुमचे घरमालक politician आहेत.’ मग मूर्ख माणसाने पत्रकार मित्राचे कगदपत्र साक्षीदार म्हणून मेल केले तर त्याला ही नकार आला कारण ‘पत्रकारही साक्षीदार म्हणून चालत नाही’ म्हणे. मग मूर्ख माणसाने ‘वकील काकाचे पेपर विनंती करून मिळवले आणि सबमिट केले पण त्यालाही नकार आला..’ ‘Lawyer and government servants साक्षीदार म्हणून चालणार नाहीत’ असं कळलं… या सर्व खटाटोपा दरम्यान ऑफीसचं काम अगदी चोख पणे चालूच होतं… आठ दिवस होऊन गेले पण एकही योग्य साक्षीदार मिळाला नाही आणि ASM च्या चेयर वर नवीन फ्रेश लोकल वर्म येऊन ठेपले… मूर्ख माणसाला केवळ एका साक्षीदारा साठी बेस्ट ‘चिप’ मोबाईल कंपनीने छाती तानून रितसर नकार दिला…

परत मूर्ख माणूस जॉबलेस झाला… आता त्याच्याकडे ना हॉटेलचा जॉब आहे, ना सेल्स एक्सीकेटिव्हचा, ना ऍड एजन्सीचा… आता परत कॉल, msg, न्यूजपेपर, job sites, मुलाखती, प्रश्नोत्तरं, अत्याचार, बलात्कार, and all…

 

चेतावनी : इस कहानी के सभी पात्र और घटनाये काल्पनिक है.. तरी तुमच्या निजी आयुष्याशी याचा काहीही संबंध असेल तर हवं ते करा… मला सांगू नका..
आणि हो यातून कहीही एक संदर्भ मिळत नाही, जर मिळालाच तर मलाही सांगा नाहीतर आहेच आपलं, “मी’बैलकामगार.कॉम!”

 

 

-D4mad

One comment
  1. Sandip patil

    जे मिळतय त्याच्या तच समाधान मानून घ्यायचं नाहीतर आपलेच एलगार तर होणारच ना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *