आयच्या गावातचला हसू येऊ द्या

माझी ‘ती’…

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक ‘ती’ असतेच. तशी माझ्याही आयुष्यात होती (म्हणजे अजूनही आहे). तिची आणि माझी ओळख खूप जुनी, अगदी मी शाळेत जायला लागलो तेव्हापासून! कालांतराने मला तिचा सहवास हवा-हवासा वाटू लागला आणि मला कळून चुकलं कि ‘मला ती आवडते’ पण ही गोष्ट मी तिला चुकूनही कळू दिली नाही! पण तिच्या व्यतिरिक्त ही गोष्ट मी कुणापासून लपवलीही नाही अगदी माझ्या आई बाबांना सुद्धा या गोष्टीची पूर्ण कल्पना होती आणि ते सुद्धा तिच्या सहवासात खुश असायचे.बऱ्याचदा तर कुणाला सांगायची गरज देखील पडत नसे केवळ माझ्या बोलण-हावभाव व इतर वागणुकी वरून माझ्या तिच्याबद्द्च्या भावना स्पष्ट दिसून येत. ती होतीच प्रत्येकाला आवडेल अशी! बेभान हवे सारखी! तिची फक्त चाहूल सुद्धा आनंद देऊन जायची, निस्वार्थ! जणू तिला स्वतःचं असं काही अस्थित्वच नव्हतं अशी वागायची, तिच्या स्वतःच्या कधीच काही इच्छा अपेक्षा नसायच्या पण दुसऱ्याच्या झोळीत क्षणिक आनंद टाकून जायची. म्हणून तर ती माझा जीव कि प्राण होती! (आताही आहे,पण जरा कमी)

‘माझ्याबद्दल तिचं काय मत आहे हे तिने कधी सांगितलंच नाही’ (अजूनही सांगितलं नाही). मीही तसं तीला कधी विचारून आग्रह केला नाही कारण तिचं मत काहीही असो मला ती आवडते बस! तिच्या सहवासाशिवाय मला अजून काही नको. (खरंच!) माझी आणि तिची भेट आठड्यातून एकदाच होते, खर सांगायचं तर मला रोजच भेटायची इच्छा असते, पण ती मोठी साहेबिन! नियमांची काटेकोर आठ्वड्यातून एकदाच भेटणार! त्यातही मला कामातून वेळ मिळाला तर मी तिला वेळ देतो अन्यथा ती दिवसा शेवटी काहीही न बोलता नाक मुरडून (रुसून) निघून जाते! आमच्या नात्यातली सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे मी तिच्यावर कितीही नाराज असलो तरी न चुकता ती मला भेटायला येते, ऊन-पाऊस -थंडी-वारा काहीही असो ती तिच्या ठरल्या वेळेत न चूकता हजर होते. ती सोबत असली कि वेळ कसा निघून जातो कळतच नाही पण तितक्याच काटेकोर पणे वेळेत ती निघूनही जाते. मागे राहतात त्या फक्त तिच्या आठवणी! आणि मी परत तिची चातका प्रमाणे वाट पाहत राहतो. तिच्याबद्दल एक बाब कौतुकाने सांगावीशी वाटते गेले कित्तेक वर्ष आम्ही सोबत आहोत आतापर्यंत एकदासुद्धा ती कधी माझ्यावर चिडली किंवा माझ्याशी भांडली नाही. मी सुद्धा कधी तिच्याशी भांडू शकलो नाही (ठरवून सुद्धा) ती आहेच तशी गोडु!
तिच्या बद्दल लिहिण्यासाठी रात्र अपुरी पडेल, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी तीच माझ्या आयुष्यातलं स्थान पूर्णपणे व्यक्त करता येणार नाही. तिच्यासारख्या माझ्या आयुष्यात बऱ्याच होत्या (आहेत) पण तिच्यसारखी फक्त तीच! ती अबोल आहे कधी बोलून व्यक्त होत नाही पण माझी सोबत कधीच सोडत नाही. अशी माझी ती ‘रविवारची सुट्टी’! कायम माझ्या सुख-दुःखात माझी साथ देते, उशिरा पर्यंत झोपण्याची परवानगी देते, डब्यात नावडती भाजी असेल तर हॉटेलात घेऊन जाते, इच्छा नसताना कपडे धुवायचं बळ देते आणि शेवटी आठवडाभर जोमानं काम करायची स्फूर्ती देऊन निघून जाते, एकटीच!

 

-D4mad

11 comments
  1. Sudarshan Awatade

    Ati Uttam … madhyasti cha romanch sadharan watla … pan shevatchya dhamakaa ne… parat madhyasti chya romacha var laksh purvak punarvachni karnyas bhaag padle. Mast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *