जनरल डबा

एक संध्यकाळ…

आज रात्रि 09.00 च्या सुमारास सुट्टी झाली बाहेर रोड वर आलो आंधार झाला होता पण रोड वरील वाहनाच्या वर्दळी मुळे रोड वर लख्ख् प्रकाश दिसत होता. माझे सीनियर जे मला प्रशिक्षण देतात त्याना आम्ही आदराने आण्णा म्हणतो तेच मला त्याच्या गाड़ी वर निशुल्क व् निस्वार्थ पने रोज नेतात-आनतात हा खरच त्याचा मोठे पना, मात्र ते आज सुट्टीवर असल्या मुळे घरी जाण्याची काही व्यवस्ता नव्हती. आठवड्यातुन एखाद-दोन वेळेस आशी पंचाय्यित होतेच त्याची आता सवयच झालेली. आता ऑफिस ते रूमच आंतर जेमतेम 6-7km ऑटो ने गेल तर अगदी दहा रूपयात सोडतात. मग ऑटो ने जाव म्हणून पाकिट काढून पहिल तर त्यात तिस रुपय आणि आज बाविस् तारिक किमान दहा दिवस पगार नाही होणार…!! याचा विचार करुण निमूट पने पाकिट खिशात ठेवल आणि पाई घरी जान्याच् ठरल आणि मनालाच बोलो “ऐके वेळी 12-13 km रोज ये-जा करणारा तू आज 6km जाऊ शकत नाही..?…चल..” आणि निघालो. तस पाई चालत जान मला काही नविन नाही पण असच नेहमी थोड़ समाधान म्हणून मनाला समजूत घालवी लागते……
मी आपला इयरफोन कानात घालून आपला रेडियो ऐकत, नाशिबाला कोसत आणि भविष्याची स्वप्न पाहत आपला हळू-हळू निघालो थोडा अंतरावर जातो नाही की तेव्हड्यात मागून दोन छोटी-छोटी पाऊल झपा-झप माझ्या समोर निघायच्या प्रयत्नात होती, तो एक लहान मुलगा होता. तसा फार लहान ही नव्हता पण तसा लाहानच म्हणावा लागेल किमान 12-13 वर्षाचा असेल. ढगळ-मगळ जीन्स पैंट, थोडा मळकट टी-शर्ट, पायापेक्षा मोठी चप्पल आणि हातात एक पन्नी (कैरीबैग,पॉलीथिन) ज्यात कदाचित डबा असावा. चेहरा माझ्या सरखा काळा माझ्या पेक्षा थोडा कमी ज्याला सावळा ही म्हणता येईल. मी त्याला पाहून माझी एक भुवइ उडवत थोड़ी स्माइल दिली तो ही अगदी निरागस पने हसला आणि मला त्याच्या दाताची उघड़ी फट दिसली ज्यामुळे त्याच हसन मला जास्तच गोड वाटल. तो बिचारा आपला ख़ाली मान करुण परत पटा-पट निघला मला जरा कुतूहल वाटल आणि मी कानातील इयरफोन काढून त्याला म्हाटल..
.
“मित्रा काय झाल? खुप उशीर झाला का? कुठे गेला होता?”
.
तो एका हाताने आपली पैंट वर करत म्हणाला
“हो आज लै उशीर झाला,मी ईकड़ हाटेलित कामाला जातो. रोज लवकर सुट्टी होती पण आज उशीर झाला”
.
आता मात्र माझ्या डोक्यात दोन-तिन प्रश्न कुजबुज करू लागले पण ते बाजूला ठेऊन मी अगोदर माझा मोबाइल त्याला देत म्हटल.
“अरे मग घरी फ़ोन कर बाबाला, आणि सांग मला थोड़ा उशीर होईल म्हणून. वाटेत आहे म्हणून सांग” (आता सरसरी सर्वाच्या घरी मोबाइल असतात म्हणून मी भावने च्या भरात म्हटल)
.
तर तो शांत पने थोडा नाराज पण हसारा चेहरा करत म्हणाला
“आमच्या घरी मुबाईल नाही”
.
आता मी माझा पहिला प्रश्न विचारला
“शाळेला सुट्या आहेत का..?”
लहान असताना मी पण कामावर जाइचो म्हणून त्याला थेट असच विचारला
.
तो आता माझ्या बरोबर चालत होता
तो म्हणाला
“दादा मी शाळात नाही जात.”
.
आता मात्र माझे प्रश्न आँखिन वाढले
मी लगेच विचारल
“का…?”
.
तर आता त्याने जे उत्तर दिल ते ऐकून मी चकित झालो की हा इतक्या कमी वयात इतका मोठा कसा झाला
तो म्हणाला
“मला पप्पा नाही आहे त्याचा एक्सिडेंट झाला आम्ही लहान होतो तवा. आई ची तब्बेत बरी नस्ती तरी बी ती लोकांचे धुनि-भांडे करती तिला घाटित जायला पैशे लगते ना.आणि एक लहान बहिन आहे”
.
मी थोडा एक मिनिट शांत झालो. त्याच्या सोबत चालत राहिलो. थोड्या वेळा पूर्वी मी माझ्या छोट्या-छोट्या प्रॉब्लम साठी नाशिबाला कोसत होतो पण माझ्या समोर जो कुणी होता त्याचे ते दोन शब्द ऐकून माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी फिक्या वाटायला लागल्या होत्या. शांतता थोड़ी असाह्य झाली होती माझे प्रश्न आनखिन वाढले मी विचारल
.
“तूझी बहिन शाळेत जाते की नाही..?”
.
तो म्हणाल
“हो जाती ना. लय हुशार आहे आता चौथी ला जाइन”
.
मी म्हटल
“कधी पासून काम करतो तु..?”
.
तो म्हणाला
“एक वर्षा पासून, सहावित होतो तवाच शाळा सोडली नाहीतर साहावी होऊं सातवीत गेलो असतो”
.
मी….
“किती पैसे मिळतात तुला महिन्याला”
.
तो….
“तिन हजार रुपये आता पाचशे रूपए वाढणार आहे सकाळी तिकरच जेवण करतो रात्रि उरल तर डब्बा भरून घेऊन पण येतो आई साठी”
.
मी….
“कधी जातो सकाळी आणि रात्रि सुट्टी कधी होते..?
.
तो…
“सकाळी धा वाजता जातो सात वासता येतो पण आज जरा उशीर झाला आज काही राहील पण नाही हॉटेल मधि आनायला आता आई घरी गेल्या वर सयपाक करण”
.
मी…
“मग ह्या पन्नीत काय आहे…?'”
.
तो…
“रिकामा डबा आणि पन्या आहे मला सकाळी लागतात त्या.”
.
मी…
“कशाला..?”
.
तो….
“मी सकाळी पेपर ची लाइन टाकतो ना, आता पाऊसाळा सुरु झाला म्हणून पेपर ओले होउ नए म्हणून पन्नी”
.
आता मात्र मी शॉक झालो तो सकाळी पेपर टाकून मग परत हे काम करतो हे ऐकून आता त्याच्या विषयी मनात आदर निर्माण झाला कारन पेपर ची लाइन टाकायचि म्हणजे रोज सकाळी किमान पाच ला उठाव लागत अगदी न चुकता रविवारी सुद्धा आणि त्यातल्या त्यात हिवाळा आणि पाऊसाळा पेपर टाकायला काय त्रास होतो हे मला जरा चांगलच माहित आहे. मी काही म्हंन्या आगोदरच तो बोल्ला
.
“आमचे शेजारचे काका रोज सकळी त्याच्या भैया ची सायकल मला नेउ देते पेपर टाकायला. आता घरी गेलो की चाबी घेतो सकाळी पेपर टाकून परत आणून देतो”.
.
मी म्हटल
“तुझ हॉटेल कुठे आहे,रोज पायी-पायी येन जान करतो? ”
.
त्याने मागे बोट करत
“बायपास ला आहे, कधी कधी भाऊ (मालक) सोडते कधी-कधी मी पाई बी येतो”
.
त्याच्या बोलण्या वरुण त्याला त्याचे शेजारी आणि त्याचा मालक वगेरे सर्व होईल तशी थोड़ी फार मदत करतात हे लक्षात आल पण हे पूरेस नाही हे मला कळत होत पण मी ही हतबल होतो त्याची मदत करावी आशी इच्छा होती पण मीच स्वता एक मोठा शुन्य आहे हे मला माहित होते. मनात विचार आला की खिशातील तिस रुपय काढून त्याला द्यावे पण परत वाटल इव्हढ्या मोठ्या अडचणीत माझ्या तिस रुपयांनी त्याच काय होणार उगाच त्याचाहि आत्मविश्वास तुटायचा की ‘पहा लोक माझी काय किम्मत करतात’ म्हणून स्वतावर आवर घातला. त्याच्या हिमतीचि खरच दाद द्यावी लागेल.
कदाचित त्याच घर जवळ आल होत माझे खुप प्रश्न बाकि होते मी माझा पुढचा शब्द बोलणार तितक्यात माझ बोलन थांबवत तो आडखळत म्हणाला.
“दादा एक सागु राग नका येऊ देऊ”
.
मी…उसूक्तेन
“आरे बोल बिनधास्त टेंशन नको घेऊ.बोल”
.
तो थोडा आडकत-अडकत लाजुन
“तुमच्या ते कानातल लाउन एक गान आईकायच होत. एकदाच”
.
मी…थोडा हसत
“अरे का नाही यार नक्की आइक. कोनत लाउ”
.
तो मोकळा हसून म्हणाला
“कोणत बी लावा”

मी त्याला गाने लाउन मोबाईल त्याच्या हातात दिला व् गान कस बदलायच ते दाखुन दिल तो गाने आइकन्यात व्यस्त झाला पण मी मात्र त्याच्या कड़े पहातच राहिलो कारन तो कुतुहलाने स्क्रीन वर टच करत होता कदाचित पहिल्यांदा त्याला मोबाइल हताळायला मिळाला असावा, गाने ऐईकताना त्याच्या चेहर्या वर जो आनंद होता, जी स्माइल होती टी मला एक किक देत होती. आणि कुठे तरी बर वाटल की मी याला आर्थिक मदत तर नाही करू शकलो पण काही क्षण त्याला आनंद तरी देऊ शकलो म्हणून मना वरचा भार थोडा कमी झाल्या सारख वाटल.
समोर दोन रस्ते आले त्याने कानातून इयरफोन काढले माझ्या हातात ते सर्व देत फ़क्त इतकंच म्हणाला.
“मस्त आहे. चला येतो , घर आल”
आणि निरोप घेत हसून हात हलवला आणि निघुन गेला
.
मी मात्र त्याला नजरे आड़ होइ पर्यत पाहत राहिलो तोहि शेवटी एकदा मागे वळून आंधारात लुप्त झाला.
पण जाताना मागे खुप सारे प्रश्न सोडून गेल
पहिला आणि मुख्य म्हणजे ‘त्याच आणि त्याच्या बहिनीच नाव काय होत..?’
मी एव्हड़ा मुर्ख अर्धा तास त्याला नुसते मनातले प्रश्न विचारले पण साध नाव नाही विचारल. त्याच नाव जे काही असेल आयुष्यात तो खुप मोठा मानुस होणार हे मात्र नक्की.
पण आता मी खुप विचारात पडलो
..तो कस निभावत असेल सर्व..?
..खुप लोक तर वडील नाही म्हणून त्रास पण देत असतील..?
..कस करेल तो एकटा जीव आई चा दवाखाना बहिनीच शिक्षण भविष्यात लग्न..?
…त्याच्या ही काही इच्छा असतील,जशी की आज त्याने काशिबशि लाजुन एक मला सांगितली…
…..पण अजुन किती गोष्टी त्याने मनात दाबून ठेवल्या असतील..

आसे किती जन असतील या जगात ज्याना कोवळ्या वयात आभाळा चा भार उचलावा लागतो. त्याना स्वप्न असतील आवडी असतील पण तरी ते बिचारे लाचार…..
.
आणि एक आपन आपल्या छोट्या छोट्या गोष्टी साथी रडत असतो. कधी एक नजर आपल्या आजूबाजला फिरवलि तर आपल्या आयुष्यातील अडचणी क्षुल्लक वटु लागतील…

विचार करत करत माझी पण रूम आली…
जेवण केल पण विचारात झोप नाही आलीच नाही..

140327-kendrick-coal-india-04
Enter a caption

-D4mad

2 comments
  1. Jerome

    Hi there i am kavin, its my first occasion too commenting anyplace, when i read this post i thought i cluld als make comment due to
    this good article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *